HiThisIs your AI receptionist
महाराष्ट्रातील क्लिनिक आणि दुकानांसाठी

तुमच्या क्लिनिक किंवा दुकानासाठी AI रिसेप्शनिस्ट, जी प्रत्येक कॉल मराठीत उचलते

पहिल्या रिंगला कॉल उचलते, कॉलरशी त्याच्या भाषेत बोलते, अपॉइंटमेंट बुक करते, आणि कॉल संपताच तुम्हाला WhatsApp वर नाव, नंबर आणि काम पाठवते. तुमचा नंबर तोच राहतो, तुमचा स्टाफ आधी उचलतो, आणि आधी सुटणारे कॉल आता सुटत नाहीत.

स्वतः ऐका: 080 3170 3333 वर कॉल करून अपॉइंटमेंट मागा.

सुटलेला कॉल म्हणजे गेलेला पेशंट

आपल्याकडे लोक व्हॉइसमेल ठेवत नाहीत. पाच रिंग वाजल्या, कोणी उचललं नाही, की कॉलर Google किंवा JustDial वरचं पुढचं नाव लावतो. प्रोसिजर चालू असताना, जेवणाच्या वेळी, रात्री आठनंतर आणि रविवारी येणारा प्रत्येक कॉल म्हणजे तुम्हाला पैसे द्यायला तयार असलेला पेशंट.

HiThisIs तो कॉल उचलते जो तुमचा स्टाफ उचलू शकत नाही. मराठी, हिंदी किंवा इंग्रजी, कॉलर ज्या भाषेत बोलेल त्याच भाषेत उत्तर देते, आणि मध्येच भाषा बदलली तर सोबत बदलते.

कॉलवर ती नेमकं काय करते

तुमच्या व्यवसायाच्या नावाने नमस्कार करते, लाइन ऑटोमेटेड आहे आणि कॉल रेकॉर्ड होऊ शकतो हे सांगते, मग ऐकते. पेशंटचं नाव, कोणत्या डॉक्टरकडे जायचं आहे, कोणती वेळ सोयीची, हे सगळं विचारते. नंबर एकेक आकडा परत सांगून खात्री करते. तुम्ही आधी सांगितलेल्या प्रश्नांची (वेळा, पत्ता, फीबद्दल काय सांगायचं) उत्तरं देते.

कॉलरला माणसाशी बोलायचं असेल आणि क्लिनिक उघडं असेल, तर तुमच्या स्टाफला कॉल जोडते. कोणी उचललं नाही तर पूर्ण माहिती घेऊन कोण, कधी कॉल करेल हे सांगते.

तुम्हाला काय मिळतं

कॉल संपताच WhatsApp वर मेसेज: पेशंटचं नाव, दहा आकडी मोबाईल नंबर, आणि त्याला काय हवं आहे. हवं असल्यास Google Sheet मध्ये प्रत्येक कॉलची ओळ. डॅशबोर्डमध्ये प्रत्येक कॉलचं रेकॉर्डिंग, ट्रान्सक्रिप्ट आणि एका ओळीचा सारांश.

परत कॉल करणाऱ्या पेशंटला नावाने ओळखते आणि नाव घेऊन बोलायला सुरुवात करते.

सुरू करायला एक दुपार पुरते

साइन अप करा, तुमच्या व्यवसायाबद्दल साध्या मराठीत किंवा इंग्रजीत लिहा (डॉक्टर, वेळा, सेवा, काय विचारायचं), नंबरसाठी लागणारी कागदपत्रं (GST किंवा नोंदणी, ओळखपत्र, पत्ता) अपलोड करा, आणि तुमचा मोबाईल किंवा लँडलाइन कॉल फॉरवर्ड करा. Jio, Airtel, Vi आणि BSNL चे कोड आमच्या कॉल फॉरवर्डिंग गाइडवर आहेत.

खरा कॉल कसा वाटतो

रिसेप्शनिस्ट: नमस्कार! मी फ्रंट डेस्कवरून बोलतेय. बोला, मी तुम्हाला कशी मदत करू?

कॉलर: मला उद्याची अपॉइंटमेंट हवी आहे.

रिसेप्शनिस्ट: नक्की. उद्याची वेळ बघते. तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगाल का?

लोक विचारतात ते प्रश्न

मला नवीन नंबर घ्यावा लागेल का?

नाही. तुमचा सध्याचा मोबाईल किंवा लँडलाइन रिसेप्शनिस्ट नंबरवर फॉरवर्ड करता, आणि फक्त तुम्ही निवडलेल्या परिस्थितीत: व्यस्त असताना, न उचलल्यास, किंवा फोन बंद असताना.

माझा स्टाफ आधी कॉल उचलू शकतो का?

हो. नेहमीचा सेटअप हाच आहे: आधी तुमचा स्टाफ, दहा-पंधरा सेकंदात कोणी उचललं नाही तर रिसेप्शनिस्ट.

किंमत किती?

रुपयांत महिन्याचा ठरलेला प्लॅन, त्यात मिनिटांचा बंडल. बंडलपेक्षा जास्त वापरल्यास प्रति मिनिट दर आधीच सांगितलेला असतो. किंमत पान पाहा.

कॉलरला हे ऑटोमेटेड आहे हे कळतं का?

हो. प्रत्येक कॉलच्या सुरुवातीला तुमच्या व्यवसायाचं नाव आणि लाइन ऑटोमेटेड असून कॉल रेकॉर्ड होऊ शकतो ही सूचना दिली जाते.

पेशंटचा डेटा सुरक्षित आहे का?

हो. डेटा भारताच्या DPDP Act 2023 नुसार हाताळला जातो. रेकॉर्डिंग आणि ट्रान्सक्रिप्ट फक्त तुमच्या अकाउंटमध्ये दिसतात आणि किती दिवस ठेवायचे हे तुम्ही ठरवता.

ही मार्केटिंग कॉल करते का?

नाही, कधीच नाही. बाहेर जाणारे कॉल फक्त तुमच्या स्वतःच्या पेशंटना अपॉइंटमेंट रिमाइंडरसारख्या सेवा सूचना असतात.

आजपासून एकही कॉल सुटू नये